Monday, October 6, 2025

Creating liberating content

अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत...

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश ठाणे : कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा...

ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा...

खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला प्रश्न, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे वेधले लक्ष...

मुंब्रा येथे कचरा पेटला

ठामपा मुख्यालयात कचरा टाकण्यास निघालेल्या शानू पठाण यांना पोलिसांनी अडविले ठाणे - मुंब्रा, कौसा...

ठाण्यात सर्वसामान्यांची ‘घर-घर’..

क्लस्टर, पुनर्विकास योजना कासवगतीने ठाणे: ठाण्यात जुन्या इमारतींचा पुनर्विकास काही बिल्डरांनी रखडवला असून १०-२०...
Homeठाणे शहरविठुरायाची ठाणे एसटी...

विठुरायाची ठाणे एसटी विभागावर कृपादृष्टी ;

आषाढीला जिल्ह्यातील १६ हजार ६८४ वारकऱ्यांची लालपरीतून वारी

ठाणे,ता.१३: दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरीने वारकऱ्यांसोबतीने पंढरीची वारी पूर्ण केली. या वारीने यंदा ठाणे एसटी विभागाने उत्पन्नाचा उच्चांक गाठला आहे. गतवर्षापेक्षा यंदा ४६ लाख ७३ हजार रुपये इतके जास्तीचे उत्पन्न झाल्याने विठुरायाची जणू कृपादृष्टी झाल्याचे बोलले जात आहे. यंदा ३०८ फेऱ्यांनी १६ हजार ६८४ वारकऱ्यांनी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करून लालपरीतून वारीचा आनंद लुटला आहे.
       पंढरपूरच्या आषाढी एकादशीनिमित्त ३ ते १० जुलै दरम्यान जादा वाहतुकीचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बसेसचे नियोजन केले होते. त्यानुसार ठाणे विभागाकडून देखाल याच कालावधीत जादा १४४ बसेसद्वारे ३०८ फेऱ्या मारल्या. जवळपास एक लाख ३२ हजार ७८२ किमी अंतर पूर्ण करून १६ हजार ६८४ भाविक प्रवाशांचा सुरक्षित ने-आण केली. या सेवेतून ठाणे विभागास यंदा ९० लाख ६८ हजार ७४० इतके विक्रमा उत्पन्न मिळाले आहे जे मागाल वर्षी पेक्षा ४६ लाख ७३ हजार रु ने जास्त आहे.
गतवर्षी २१३ फेऱ्यांमध्ये ९३ हजार ८८८ किमी अंतर पूर्ण केले होते. तेंव्हा ४३ लाख ९५ हजार ४३१ इतके उत्पन्न मिळेल होते. तसेच त्यावेळी भारमान ७८.१२ इतके होते. तेच भारमान यंदा थेट ९४.८६ इतके झाले आहे.
* तक्ता 
आगार   फेऱ्या   किमी      उत्पन्न
ठाणे १   ४८      १९१३५   १३६६३२२
ठाणे २   ५२      १९००५   १५९१०२१
भिवंडी    ३८   १७२७४      १११०१८५
शहापूर   ३४   १५४१५       १०७००४०
कल्याण  ३४    १५५१९    ७९९९४५
मुरबाड   ३८    १६६२५   ११४११०४
विठ्ठलवाडी ३२   १४२३०  ९५५७७२
वाडा    ३२     १५५७९   १०३४३५१
ठाणे विभाग३०८ १३२७८२ ९०६८७४०
गतवर्षी    २१३  ९३८८८    ४३९५४३१
२०२४