Monday, October 6, 2025

Creating liberating content

अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत...

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश ठाणे : कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा...

ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा...

खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला प्रश्न, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे वेधले लक्ष...

मुंब्रा येथे कचरा पेटला

ठामपा मुख्यालयात कचरा टाकण्यास निघालेल्या शानू पठाण यांना पोलिसांनी अडविले ठाणे - मुंब्रा, कौसा...

ठाण्यात सर्वसामान्यांची ‘घर-घर’..

क्लस्टर, पुनर्विकास योजना कासवगतीने ठाणे: ठाण्यात जुन्या इमारतींचा पुनर्विकास काही बिल्डरांनी रखडवला असून १०-२०...
Homeठाणे शहरठाणे जिल्हा माहिती...

ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातील “टेरेस गार्डन” ला

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली भेट

ठाणे: ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावर “WASTE TO BEST” या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या “टेरेस गार्डन” ला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काल (दि.7 जुलै रोजी) भेट दिली. यावेळी पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी त्यांना टेरेस गार्डनबाबत तसेच झाडांचे संगोपन, थ्रेड टू ट्रेंड याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी ठाणे जिल्हा सैनिक कल्याण समितीचे नागरी सदस्य दिलीप गुप्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल भाट, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी राजू भोये, स्वरुप हुले उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ, उपयोगी, स्वस्त अशी वस्तू निर्माण करणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. 3R म्हणजेच रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या तत्वांचा अवलंब करून या गार्डनमधील वस्तू बनवलेल्या असून आपली जीवनशैली याच तत्वांवर उभी करणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले की, निसर्गपूरक व निसर्गसंवर्धन अशा पद्धतींचा अवलंब आपल्या जीवनाचा भाग बनावा, ही शासनाची अपेक्षा आहेच, तोच धागा पकडून आपणही या कार्यात झोकून देवूयात. जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले ‘लोकराज्य’ मासिक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने भेट दिले. तसेच भारतीय सैन्यदलाच्या महाराष्ट्रातील शौर्य पुरस्कार विजेत्या अधिकारी-जवानांवरील ‘महारथी महाराष्ट्राचे’ या पुस्तकांचे 4 भाग जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांना लेखक तथा ठाणे जिल्हा सैनिक कल्याण समितीचे नागरी सदस्य दिलीप गुप्ते यांनी भेट दिले.