Sunday, October 5, 2025

Creating liberating content

अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत...

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश ठाणे : कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा...

ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा...

खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला प्रश्न, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे वेधले लक्ष...

ठाण्यात सर्वसामान्यांची ‘घर-घर’..

क्लस्टर, पुनर्विकास योजना कासवगतीने ठाणे: ठाण्यात जुन्या इमारतींचा पुनर्विकास काही बिल्डरांनी रखडवला असून १०-२०...

कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आमदार केळकर...

ठाणे: म्हाडाच्या सदनिका लाटल्या, एअर फोर्स स्टेशन क्षेत्रात नियम डावलून बहुमजली इमारती, एकाच...
Homeठाणे शहरमुंब्रा येथे कचरा...

मुंब्रा येथे कचरा पेटला

ठामपा मुख्यालयात कचरा टाकण्यास निघालेल्या शानू पठाण यांना पोलिसांनी अडविले

ठाणे – मुंब्रा, कौसा येथील कचरासमस्येने आता उग्र रूप धारण करू लागली आहे. गेल्या पाच दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी कचर्याने भरलेल्या पाच गाड्या थेट ठाणे महानगर पालिका मुख्यालयाच्या दिशेने वळविल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतले. 

काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था करण्यात ठाणे पालिकेला यश येत नसल्याने येथील कचराच उचलला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील कचरा उचलावा, यासाठी अनेकवेळा संबधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या शानू पठाण यांनी नाक्यानाक्यावर कचरा भरून गाड्या ठामपाच्या दिशेने वळविल्या.  या गाड्या ते ठामपा मुख्यालयासमोर रिकाम्या करणार होते. कौसा,  अमृत नगर, रशीद कंपाउंड आदी भागातील कचरा त्यांनी मुख्यालयासमोर फेकण्याचा निर्धार केला होता. मात्र, पोलिसांनी गाड्या अडवून त्यांना ताब्यात घेतले.