Monday, October 6, 2025

Creating liberating content

अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत...

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश ठाणे : कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा...

ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा...

खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला प्रश्न, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे वेधले लक्ष...

मुंब्रा येथे कचरा पेटला

ठामपा मुख्यालयात कचरा टाकण्यास निघालेल्या शानू पठाण यांना पोलिसांनी अडविले ठाणे - मुंब्रा, कौसा...

ठाण्यात सर्वसामान्यांची ‘घर-घर’..

क्लस्टर, पुनर्विकास योजना कासवगतीने ठाणे: ठाण्यात जुन्या इमारतींचा पुनर्विकास काही बिल्डरांनी रखडवला असून १०-२०...
Homeठाणे शहरठाणे जिल्हा परिषद,...

ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना २१ जुलैपर्यंत मुदत

ठाणे : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा अधिनियम ५) चे कलम १२ पोटकलम (१) अन्वये ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेबाबत राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी, जिल्हाधिकारी ठाणे यांच्या क्रमांक/जिकाठा/सा.शा/जि.प.पं.स.नि-२०२५/प्रभाग रचना कार्य २०२५, १४ जुलै २०२५, च्या आदेशाच्या मसुद्याची प्रत 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच कल्याण / भिवंडी / शहापूर / मुरबाड / अंबरनाथ तहसिलदार आणि पंचायत समिती कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहे. 

      हा मसुदा राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिनगारे  यांच्याकडून त्या आदेशात नमूद केल्यानुसार १४ जुलै २०२५ नंतर विचारात घेण्यात येईल, आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने / हरकती / सूचना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २१ जुलै २०२५ पर्यंत सादर कराव्यात.या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने / हरकती / सूचना इत्यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.