Sunday, October 5, 2025

Creating liberating content

अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत...

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश ठाणे : कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा...

ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा...

खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला प्रश्न, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे वेधले लक्ष...

मुंब्रा येथे कचरा पेटला

ठामपा मुख्यालयात कचरा टाकण्यास निघालेल्या शानू पठाण यांना पोलिसांनी अडविले ठाणे - मुंब्रा, कौसा...

ठाण्यात सर्वसामान्यांची ‘घर-घर’..

क्लस्टर, पुनर्विकास योजना कासवगतीने ठाणे: ठाण्यात जुन्या इमारतींचा पुनर्विकास काही बिल्डरांनी रखडवला असून १०-२०...
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे...

विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम सुरू होणार

नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि त्र्यंबकेश्वर – नाशिक येथील जॅग्वार्स डिफेन्स अकॅडमी यांच्यात आपत्ती व्यवस्थापन विषयक शिक्षणक्रमांच्या संयुक्त आयोजनासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार सहा आठवड्यांचा जनजागृती कार्यक्रम, सहा महिन्यांचा प्रमाणपत्र आणि एक वर्ष कालावधीचा पदविका असे तीन शिक्षणक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याप्रसंगी बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की सदर शिक्षणक्रम हे मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमांतून उपलब्ध असतील. ६०% सैद्धांतिक व ४०% प्रात्यक्षिक अशी त्याची विभागणी राहील. प्रशिक्षण ऑनलाइन, ऑफलाइन आणि मिश्र पद्धतीने घेतले जाईल. या शिक्षणक्रमामुळे आपत्ती काळातील सजगता, प्रतिसाद, आणि सुरक्षिततेसंदर्भातील कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार असून रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. जॅग्वार्स डिफेन्स अकॅडमीचे कर्नल ब्रम्हासिंग यांनी सदर शिक्षणक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार, आपत्ती प्रतिसाद, मॉक ड्रिल्स, फील्ड व्हिजिट्स आणि प्रकल्प कार्य यांचाही अनुभव दिला जाईल असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विद्यापीठाचे पोर्टल वापरण्यात येईल. शिक्षणक्रम मंजुरी, विद्यार्थ्यांचे प्रवेश, मूल्यांकन, यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र किंवा पदविका प्रमाणीकरण यांची जबाबदारी विद्यापीठ सांभाळेल तर शिक्षणक्रम गुणवत्ता नियंत्रणापासून ते परीक्षांचे आयोजन, प्रशिक्षण साहित्य, आणि प्रशिक्षणाचे प्रत्यक्ष आयोजन जॅग्वार्स डिफेन्स अकॅडमी करणार आहे.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड, विद्यापीठ अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्र (सिका) संचालक डॉ. मधुकर शेवाळे, ग्रामीण विकास आणि उद्योजकता केंद्राचे संचालक प्रा. कैलास मोरे, जॅग्वार्स डिफेन्स अकॅडमीचे कर्नल प्रमोद नयनन, कॅप्टन आर्यमन सिंग व कमांडर श्री. रामकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती.