Friday, July 4, 2025

Creating liberating content

ठाणे मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला...

* मासुंदा, खारकर आळी, चरई भागात लवकरच कार्यान्वित * आमदार संजय केळकर यांचा पुढाकार.. ठाणे:जुन्या...

कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क...

रत्नागिरी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी (Chief Public Relations Officer)...

‘कोकण शौर्य’ राष्ट्रीय मेनु...

रत्नागिरी : महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर राष्ट्रीय...

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक...

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
Homeठाणे शहरवायू प्रदूषणाच्या तक्रारी...

वायू प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाइन सुरू

ठाणे:- वायू प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने (TMC) विविध उपाययोजना राबवल्या आहेत.यासोबतच ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार वायू प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाइन (8657887101) सुरू करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील वायू प्रदूषणाबाबत नागरिकांनी 8657887101 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

कचरा जाळणे, बांधकामादरम्यान परिसरात होणारी धूळ, बांधकाम कचरा/डेब्रिज, (सी आणि डी वेस्ट) रस्त्यांवरील वाहतूक, रस्त्यांच्या कामांमुळे होणारे प्रदूषण, बांधकामाच्या कचऱ्याचे डंपिंग, वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग आदी तक्रारी फोटोसह व्हॉट्सअॅपद्वारे नोंदवल्या जाऊ शकतात.

ठाणे महापालिका प्रशासन तक्रारीची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करेल.त्यात दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे.फटाक्यांबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे कारवाईसाठी पाठवल्या जातील.