Friday, July 4, 2025

Creating liberating content

ठाणे मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला...

* मासुंदा, खारकर आळी, चरई भागात लवकरच कार्यान्वित * आमदार संजय केळकर यांचा पुढाकार.. ठाणे:जुन्या...

कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क...

रत्नागिरी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी (Chief Public Relations Officer)...

‘कोकण शौर्य’ राष्ट्रीय मेनु...

रत्नागिरी : महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर राष्ट्रीय...

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक...

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
Homeमुंबई मेट्रोनवी मुंबई मेट्रो...

नवी मुंबई मेट्रो आजपासून धावणार; पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंधर दरम्यान सेवा

नवी मुंबई : मंत्र्यांच्या तारखांअभावी मागील वर्षभरापासून रखडलेला नवी मुंबईमेट्रोचा प्रवास शुक्रवारपासून प्रत्यक्षात साकारत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार उद्घाटनाची औपचारिकता न करता बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रोचा पहिला टप्पा आजपासून प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी घेतला.

दीर्घकाळ रखडलेला बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानकांसह तळोजा पांचनंद येथे आगार (डेपो) आहेत. मेट्रोचे संचालन करण्यासाठी सिडकोने महामेट्रोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याची सर्व तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे. परंतु, केवळ उद्घाटनाच्या सोपस्कारासाठी हा प्रवास रखडला होता. नागरिकांमधून नाराजीचे सूर उमटू लागल्याने मेट्राे आता धावू लागेल.

दुपारी तीन वाजता धावणार पहिली मेट्रो

बेलापूर ते पेंधर दरम्यान दोन्ही स्थानकांतून दुपारी तीन वाजता पहिली मेट्रो धावणार आहे, तर शेवटची मेट्रो रात्री दहा वाजता असेल. १८ नोव्हेंबरपासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान सकाळी सहा वाजता पहिली मेट्रो धावणार असून, दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी रात्री दहा वाजता होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.

पंतप्रधानांचा दाैरा रद्द झाल्यामुळे…
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन करण्याची योजना सिडकोने आखली होती. मात्र, पंतप्रधानांचा नियोजित नवी मुंबई दौरा रद्द झाल्याने हा मुहूर्त टळला. त्याच वेळी मेट्रो सेवा सुरू करावी, या मागणीसाठी विविध राजकीय पक्षांनी सिडकोच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

१० ते ४० रुपये असेल तिकीट दर
 ० – २ किमी : १० रुपये
 २ ते ४ किमी : १५ रुपये
 ४ ते ६ किमी : २० रुपये
 ६ ते ८ किमी : २५ रुपये
 ८ ते १० किमी : ३० रुपये
 १० किमी : पुढील अंतरासाठी
४० रुपये प्रवास भाडे.

बेलापूर ते पेणधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत असून, नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे.
– अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको