Friday, April 4, 2025

Creating liberating content

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक...

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...

जालन्यात आज ओबीसींची आरक्षण...

जालना : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ज्या...

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र...

पुणे:- महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध असून या माध्यमातून राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते....

महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेचे...

पुणे:-धाराशिव येथे सुरू 65 व्या महाराष्ट्र केसरी गदेचे पुण्यात विधिवत पूजन करण्यात आले....
Homeकोकण'कोकण शौर्य' राष्ट्रीय...

‘कोकण शौर्य’ राष्ट्रीय मेनु २०२४ शिबिरचा एन.सी.सी. डायरेक्टर ब्रिगेडियर व्ही.एन.कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शुभारंभ

रत्नागिरी : महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण शौर्य’ हे मेनू शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ एन.सी.सी. डायरेक्टर ब्रिगेडियर व्ही.एन.कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला.

ब्रिगेडियर कुलकर्णी यांनी ध्वज दाखवून शिबिरार्थींना मार्गस्थ केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, कमांडर के. राजेश कुमार, कार्यकारी अधिकारी अंकित रवी, कोस्टगार्डचे अधिकारी आदी उपस्थित होते. २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसीने अभियान राबवून कोकणातील समुद्र किनारे स्वच्छ करण्याचे काम केले आहे, त्याबद्दल त्यांचे ब्रिगेडियर व्ही.एन.कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून कौतुक केले. तसेच ‘कोकण शौर्य’ शिबिरात निवड झालेल्या शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या.
स्वच्छ कोकण, सुरक्षित कोकण अणि सुंदर कोकण हे ब्रीद घेऊन हे १० दिवसांचे राष्ट्रीय स्तरावरील शिबिर पार पडत आहे. या शिबिरासाठी राज्य भरातील एकूण ६० छात्रांची निवड झाली आहे. रत्नागिरी ते रणपार पावस, पूर्णगड, आंबोळगड, विजयदूर्ग आणि देवगड परत याच मार्गाने रत्नागिरी असा २३५ कि.मी.चा सागरी प्रवास सहभागी शिबिरार्थी करणार आहेत. शिबिरा दरम्यान स्वच्छता व सुरक्षित तटाबाबत पथनाट्य, कविता यांच्या माध्यमातून बाजारपेठ, शाळांमधून जनजागृती करण्यात येणार आहे. तटीय स्वच्छतेबरोबरच समुद्रामधील स्वच्छता विशेषत: प्लॅस्टिक निर्मूलन याबाबत जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.